बुलडाणा (घाटावर)

…तर अंगणवाडी सेविका, मदतनीस अन्‌ कर्मचाऱ्यांना द्या पगारी सुटी; आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांची मागणी

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महिला व बाल विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच कार्यालयीन कर्मचारी यांना कोरोनामुळे पॉझिटिव्ह झाल्यास किंवा क्‍वारंटाइन व्हावे लागल्यास पगार कपात करण्यात येते. अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधन तत्वावर असल्याने त्यांचेही मानधन कापले जाते. हा त्यांच्यावर अन्याय असून कोरोना योद्धा म्हणून लढत असताना बक्षीस स्वरूपात काही देणे तर दूरच कोरोनामुळे आजारी पडल्यास पगार किंवा मानधन कपात केले जात असल्याने महिला व बाल कार्यक्रमाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारी सुटी देण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी महिला व बाल कल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या कडे त्यांना प्रत्यक्ष भेटून एका निवेदनाव्दारे केली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: