क्राईम डायरीमुख्य बातम्या

तिच्‍याकडे टक लावून पहायचा… ती दूर्लक्ष करायची… काल सायंकाळी त्‍याने हद्दच केली…; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 21 वर्षीय विवाहित तरुणीचा वाईट उद्देशाने हात पकडून जबरदस्ती करणाऱ्या तरुणाविरोधात बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

जोहरनगर, बुलडाणा येथे राहणाऱ्या विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली. शेख युनूस (25) हा तिच्या गल्लीत घराजवळच राहतो. अनेक दिवसांपासून तो तिच्‍याकडे टक लावून पहायचा. वाईट हातवारे, इशारे करायचा व अनेकदा पाठलाग करायचा. काल, 9 एप्रिलला सायंकाळी विवाहिता तिच्या गच्चीवर असताना शेख युनूस हा शेजारच्या गच्चीवरून तिच्‍याकडे पाहून इशारे करत होता. याबद्दल जाब विचारला असता त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. थोड्या वेळात ती गच्चीवरून खाली आली असता शेख युनूसने तिचा वाईट उद्देशाने हात पकडून जबरदस्ती केली व विनयभंग केला. रात्री उशिरा याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. त्‍यावरून गुन्‍हा दाखल झाला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: