क्राईम डायरीमुख्य बातम्या

तीन आत्‍महत्‍यांनी खामगाव हादरले..! दोन विवाहिता, एका युवकाने उचलले टोकाचे पाऊल!!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः खामगाव तालुक्‍यात आत्‍महत्‍येच्‍या तीन घटना आज, १३ जुलैला समोर आल्या आहेत. यात दोन विवाहिता आणि एका युवकाने आत्‍महत्‍या केली आहे.

घटना पहिली ः निमकवळा (ता. खामगाव) येथील सौ. शीतल दिलीप भोसले (२८) हिने आज, १३ जुलैच्‍या पहाटे सहापूर्वी राहत्या घरी स्टोल स्लॅबला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचे पती दिलीप भोसले त्यांच्या मोठ्या चार वर्षीय मुलीला घेऊन बहिणीच्‍या गावाला गेले होते. घरी सौ. शीतलसह सासरे, सासू व लहान दीड वर्षीय मुलगी होती. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहीपर्यंत आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

घटना दुसरी ः आजाराला कंटाळून ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात सिलिंग फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज पहाटे सहापूर्वी आवार (ता.खामगाव) येथे समोर आली. सौ. वैशाली शंकर लोनाग्रे (३५) यांच्या अंगात ७-८ महिन्यांपासून नेहमी अंगार व्हायची. त्‍यांच्‍यावर खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. १२ जुलैच्या रात्रीनंतर तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज पहाटे समोर आली. घटनेची माहिती नातेवाईकांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगावच्‍या सामान्य रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी सहदेव लोनाग्रे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली आहे.

घटना तिसरी ः २३ वर्षीय युवकाने स्वतःच्या शर्टाच्या साहाय्याने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १२ जुलैच्‍या रात्री ११ च्या सुमारास खामगाव येथील टॉवर गार्डनमध्ये उघडकीस आली. खामगाव शहरातील धोबी खदान भागातील रहिवासी शुभम बबन मोरे याने निंबाच्या झाडाला गळफास घेतला आहे. ही घटना नागरिकांना कळताच त्यांनी माहिती शहर पोलीस ठाण्याला दिली. पोहेकॉ गजानन जोशी यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: