कोरोना अपडेट्सबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

तीन महिलांसह एका पुरुषाचा बळी!; कोलारा, हिवरखेड, जानेफळमध्ये कोरोना उद्रेक!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा ) ः जिल्ह्यात आज, 24 फेब्रुवारीला कोरोनाने 4 बळी घेतले आहेत. उपचारादरम्यान तेल्हारा (ता. चिखली) येथील 65 वर्षीय पुरुष, टाकरखेड वायाळ (ता. देऊळगाव राजा) येथील 67 वर्षीय महिला, धोत्रा भणगोजी (ता. चिखली) येथील 80 वर्षीय महिला व जाळीचा देव (ता. भोकरदन जि. जालना) येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना (12), हिवरखेड (18) आणि जानेफळमध्ये (19) जणू कोरोना उद्रेक घडला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आजचा आकडा 368 असून, 132 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्‍याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2144 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1776 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 368 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 298 व रॅपीड टेस्टमधील 70 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 1061 तर रॅपिड टेस्टमधील 715 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

चिखली शहर : 43, चिखली तालुका : हातणी 1, कोलारा 12, अंत्री खेडेकर 1, धोडप 1, देऊळगाव धनगर 5, शेलूद 2, मंगरूळ नवघरे 2, इसरूळ 2, मुरादपूर 1, वळती 2, खैरव 3, धोत्रा भणगोजी 1, भाणखेडा 2, अंचरवाडी 2, सवणा 1, खंडाळा 1, मेरा खुर्द 1, वाघोरा 1, सावरगाव डुकरे 3, तेल्हारा 1, भोरसा भोरसी 1, दहीगाव 3, अमडापूर 1, आमखेड 1, गजरखेड 3, सिंदखेड राजा शहर : 2, सिंदखेड राजा तालुका : रताळी 1, मोहाडी 1, भरोसा 2, दुसरबीड 1, खैरखेड 1, सातेगाव 1, खामगाव शहर : 27, खामगाव तालुका : हिवरखेड 18,बोथाकाजी 1,बोरी अडगाव 3,अंत्रज 6, भालेगाव 1, रोहणा 1, सुटाळा बुद्रूक 1, घाटपुरी 1, पिंप्राळा 1, बुलडाणा तालुका : अजिसपूर 1, माळवंडी 2, बिरसिंगपूर 1, दहीद बुद्रूक 2, साखळी 1, सागवन 1,गिरडा 1, दत्तपूर 1, मोंढाळा 1, बुलडाणा शहर : 49, शेगाव शहर : 31, शेगाव तालुका : जानोरी 9, जवळा 2, चिंचोली 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : आरडव 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : बाऱ्हई 2, जानेफळ 19, हिवरा आश्रम 1, जळगाव जामोद शहर : 14, जळगाव जामोद तालुका : सुनगाव 1, कुरणगड 4, देऊळगाव राजा शहर : 15, देऊळगाव राजा तालुका : वाढोणा 1, चिंचोली बुरूकुल 1, आळंद 1, देऊळगाव मही 2, डोढ्रा 1, नांदुरा शहर : 15, नांदुरा तालुका : पोटळी 1, चांदुर बिस्वा 1, नारखेड 1, माळेगाव गोंड 1, मोताळा तालुका : मूर्ती 2, सिंदखेड 1, मोताळा शहर : 1, मलकापूर शहर : 1, मूळ पत्ता पुसद जि. यवतमाळ 1, जाळीचा देव जि. जालना 2 अशाप्रकारे जिल्ह्यात 368 रुग्ण आढळले आहेत.

123 रुग्‍णांनी कोरोनावर केली मात

आज 123 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः खामगाव : 13, बुलडाणा : अपंग विद्यालय 34, देऊळगाव राजा : 21, चिखली : 37, मलकापूर : 14, नांदुरा : 1, मेहकर : 4.
तसेच आजपर्यंत 124938 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14945 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

2144 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 124938 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14945 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 6332 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 17280 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 2144 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 191 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: