क्राईम डायरीमुख्य बातम्या

तुमची मुलगी द्या नाहीतर पळवून नेतो…म्‍हणाले अन्‌ खरंच 15 वर्षीय मुलीला पळवून नेले… गांगलगाव येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तुमची मुलगी द्या. तिच्यासोबत लग्न करायचे आहे. नाही दिली तर पळवून नेईल, अशी धमकी देऊन युवकाने मित्राच्‍या मदतीने 15 वर्षीय मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील गांगलगाव येथे समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महेश आणि गणेश अशी संशयितांची नावे आहेत. ते दोघेही पुणे जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येते.

काल, 26 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजता मुलीची आई शेतात काम करण्यासाठी गेली होती. ही संधी संशयितांनी त्‍यांच्‍या मुलीला पळवून नेले. दिवसभर त्यांचा शोध घेऊनही मिळून न आल्याने काल रात्री साडेअकरा वाजता मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही युवकांविरद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजवंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ निवृत्ती पोफळे करीत आहेत. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीचे कुटुंब पुणे जिल्ह्यात कामासाठी गेले होते. तिथेच या मुलांची ओळख या कुटुंबाशी झाली होती. त्‍यातूनच या मुलांनी थेट गावात येऊन मुलगी पळवून नेण्याचे धाडस केले, असे समजते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: