क्राईम डायरीमुख्य बातम्या

तुम्‍ही प्रमोद आंबटकर यांना ओळखता का?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनोळखी व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात आज, १७ जुलैला सकाळी आठच्या सुमारास मृत्यू झाला. काल, १६ जुलैला रात्री साडेअकराच्‍या सुमारास त्‍याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात अनोळखी व्‍यक्‍तीने भरती केले होते. भरती केल्यानंतर हा व्‍यक्‍ती निघून गेला. अत्‍यावस्‍थ असल्याने तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्‍याचा मृत्‍यू झाला. या व्‍यक्‍तीचे नाव प्रमोद आंबटकर असे सांगण्यात येत असले तरी ताे नेमका कुठला आहे, त्‍याला जखमी कुणी केले, की अपघात झाला हे अद्याप स्‍पष्ट नाही. त्याच्या अंगावर मारहाणीच्‍या खुणा दिसत असल्याचे घातपाताचीही शक्‍यता नाकारता येत नाही. त्याची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गोरा रंग, मजबूत बांधा, बारीक दाढी, मोठे केस, उंची अंदाजे साडेपाच फूट, अंदाजे वय ३५ ते ४० अशा वर्णनाचा हा व्‍यक्‍ती कुणाच्‍या ओळखीचा असल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकीत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क क्रमांक : 9890945983 , 9623243733

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: