क्राईम डायरीमुख्य बातम्या

तू त्‍याच्‍यासोबत फोनवर बोल नाही तर तुमचं अफेअर वडिलांना सांगतो…; अल्पवयीन मुलीला धमकावले, विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्‍हा

मोताळा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तू त्‍याच्‍यासोबत फोनवर बोल नाही तर तुमचे संबंध तुझ्या वडिलांना सांगतो असे म्‍हणून अल्पवयीन मुलीला धमकावल्या प्रकरणी व विनयभंग केल्या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मूर्ती (ता. मोताळा ) येथील दोन तरुणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. त्‍यांना अटकही करण्यात आली.
या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्‍या आईने तक्रार दिली. तक्रारीत म्‍हटले आहे, की त्‍यांची मुलगी 12 मार्चला घरासमोर अंगणात भांडे घासत होती. त्‍यावेळी तिथे किसना समाधान गायकवाड (21) आला. त्‍याने तिला हात पकडून बाजूला ओढत नेले व म्‍हणाला, की आताच रामा उर्फ रामेश्वर अशोक तळेकर (25) याच्‍यासोबत फोनवर बोल. तिने बोलण्यास नकार दिला असता किसनाने तिला तुझे व त्‍याचे संबंध तुझ्या वडिलांना सांगतो. धमकी दिल्यानंतर त्‍याने तिचा विनयभंग केला. या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने रामा तळेकर व किसना गायकवाड या दोघांविरुद्ध पोस्कोचा गुन्‍हा दाखल करून अटक केली. यातील रामा तळेकरला 14 मार्चला अटक केली असून, त्‍याला न्‍यायालयासमोर हजर केले असता न्‍यायालयाने 14 दिवसांची न्‍यायालयीन कोठडी सुनावली तर दुसरा आरोपी किसना गायकवाडला 15 मार्चला अटक केली आहे. तपास पोलीस निरिक्षक माधवराव गरूड यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अनिल भुसारी करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: