क्राईम डायरीमुख्य बातम्या

तू दिसायला चांगली नाही, मला पसंत नाही…म्‍हणत विवाहितेचा मांडला छळ; चिखलीत 18 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये माहेरहून आण, नाही तर तुला घासलेट टाकून पेटवून देऊ, अशी धमकी देत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी पतीसह सासरच्या 18 जणांविरुद्ध चिखली पोलिसांनी काल, 15 एप्रिलला रात्री गुन्‍हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सौ. भाग्यश्री जयसिंग चव्हाण (25, रा. चिखली, ह.मु. किनगाव जट्टू, ता. लोणार) या विवाहितेने तक्रार दिली आहे. भाग्यश्रीचे  लग्‍न जयसिंग प्रेमसिंग चव्हाण (रा. चिखली) याच्यासोबत 28 मार्च 2019 रोजी झाले होते. लग्‍नानंतर केवळ 6 महिनेच विवाहितेला चांगले वागवले. त्यानंतर तू दिसायला चांगली नाही. मला पसंत नाही, असे तिचा पती नेहमी म्हणायचा व भांडण करायचा. तसेच घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये घेऊन ये नाही तर तुला घासलेट टाकून जिवंत जाळून टाकीन, अशी धमकी सासरचे लोक देत होते असे विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. छळ असह्य झाल्याने ती काही महिन्यांपासून माहेरी गेली होती. काल चिखली पोलीस ठाण्यात तिने पतीसह 18 जणांविरोधात तक्रार दिली. त्‍यावरून पती जयसिंग प्रेमसिंग चव्हाण, सासरा प्रेमसिंग चंदू चव्हाण, शालीग्राम चंदू चव्हाण, उत्तम चंदू चव्हाण, पंडीत राठोड, राजू नेमा राठोड, रमेश कैलास पवार, अमोल राजू राठोड (सर्व रा. चिखली), रामराव धोंडू राठोड (रा. वाघाळा, ता. सिंदखेड राजा) , स्वप्नील शिवहरी राठोड, वैभव शिवहरी राठोड, शिवहरी किसन राठोड (तिघे रा. झोटिंगा ता.सिंदखेड राजा) ,रुपाली रमेश पवार, सुनिता राजू राठोड, सुरेखा शिवहरी राठोड, रेणुका श्यामराव राठोड, यशोदा प्रेमचंद चव्हाण, अनिता पंडीत राठोड ( रा.चिखली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: