क्राईम डायरी

तू मेली तरी आम्‍हाला फरक पडत नाही म्‍हणाला…. तिने खरंच विहिरीत उडी घेतली..!; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तू मेली तरी आम्‍हाला फरक पडत नाही, असे म्‍हणून विवाहितेचा छळ सासरच्‍यांनी मांडला. त्‍यामुळे वैतागून तिने विहिरीत उडी घेतली. मात्र सुदैवाने वाचली. तिने काल, 1 एप्रिलला पिंपळगाव राजा पोलीस ठाणे गाठून सासरच्यांविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी पतीसह, सासू, सासऱ्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

अनिल श्रीहरी तायडे (पती), श्रीहरी काशिराम तायडे (सासरे), गिताबाई श्रीहरी तायडे (सासू, सर्व रा. ढोरपगाव) अशी गुन्‍हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्‍यांच्‍याविरुद्ध सौ. शितल अनिल तायडे (रा. ढोरपगाव) या विवहितेने तक्रार दिली आहे. तिने तक्रारीत म्‍हटले आहे, की तिचे लग्न 2018 सालीअनिलसोबत झाले आहे. लग्नानंतर काही दिवसांनी अनिल व त्‍याच्‍या आई-वडिलांनी संगनमत करून लहान-लहान कारणावरून तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. सतत मारहाण करत असत. 27 मार्चला तिचा पती अनिल तायडे याने ‘तू मेली तरी आम्हाला काही फरक पडणार नाही’ असे तिला म्हटले. त्‍यामुळे तिने सततच्या त्रासाला कंटाळून 27 मार्च रोजी विहिरीत उडी घेतली होती. सुदैवाने ती वाचली. त्‍यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: