बुलडाणा (घाटावर)

दगडवाडी ते असोला जहाँगीर फाटा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा!; शिवसंग्राम संघटनेने अधिकार्‍यांना दिले निवेदन

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दगडवाडी ते असोला जहाँगीर फाटा हा दोन किलोमीटरचा रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. वन विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाने याची दखल घेऊन रखडलेले काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेने कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग व वन विभागाच्या अधिकार्‍यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की पुणे -नागपूर या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम देऊळगाव राजा ते बेराळा फाट्यापर्यंत सुरू आहे. दोन वर्षांपासून काम संथगतीने काम सुरू आहे. दगडवाडी ते असोला जहाँगीर फाटा हा दोन किलोमीटरचा रस्ता वन विभागाने अडवला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. एका बाजूने रस्ता खोदून ठेवल्याने रस्त्यावर मातीचे ढिगार असून दुसर्‍या बाजूने मोठ मोठे धोकादायक खड्डे पडलेले असल्याने वाहनधारकांना हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे. वाहन चालवणे कठीण झाल्याने या रस्त्यावर रोज लहान- मोठे अपघात होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग व वन विभागाने याबाबत पुढाकार घेऊन अर्धवट राहिलेले रस्त्याचे काम तात्काळ पुन्हा सुरू करावे, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे यांनी निवेदनाव्दारे केली आहे. निवेदन देताना तालुका संघटक जहीर खान पठाण, विनायक आपटे, अमजत खान, अयाज पठाण, चंद्रभाग झिने, संतोष हिवाळे आदी हजर होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: