क्राईम डायरीमुख्य बातम्या

दवाखान्यात जाऊन येते म्हणाली… १८ वर्षीय तरुणी घरी परतलीच नाही!; चिखली तालुक्यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दवाखान्यात जाऊन येते असे सांगून घरून निघून गेलेली १८ वर्षीय तरुणी परतलीच नाही. ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी आज, २ ऑगस्टला अंढेरा पोलीस ठाण्यात दिली आहे. दीपाली मनोहर गोळे (१८, रा. अमोना, ता. चिखली) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे.

काल १ ऑगस्टला दीपालीचे आई- वडील शेतात गेले होते. त्यावेळी दीपाली व तिची लहान बहीण दिशा घरी होती. दुपारी पेठ येथे दवाखान्यात जाऊन येते, असे दीपालीने लहान्या बहिणीला सांगितले व घरून निघून गेली. सायंकाळी सहाला आई- वडील शेतातून घरी परतले तरीही दीपाली परतली नव्‍हती. आई- वडिलांनी कालपासून तिचा नातेवाइक व इतर ठिकाणी शोध घेतला. मात्र ती मिळून न आल्याने आज अंढेरा पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली आहे. गोरा रंग, पाच फूट उंची, लांब केस,अंगात पांढरी लेगिंग व राखाडी टॉप व त्यावर पांढरी ओढणी व गुलाबी चप्पल अशा वर्णनाची मुलगी आढळून आल्यास अंढेरा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: