क्राईम डायरीमुख्य बातम्या

दवाखान्यासमोरून लांबवली तरुणाची मोटारसायकल; चिखलीतील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दवाखान्यात भरती केलेल्या आईला डबा घेऊन आलेल्या मुलाची मोटारसायकलच चोरट्याने लांबवली. ही घटना काल, ६ जुलैला सकाळी समोर आली. चोरटा सीसीटीव्‍हीत कैद झाला आहे. अंदाजे २० वर्षे वयाच्‍या मुलाने ही दुचाकी चोरून नेल्याचे त्‍यात दिसत आहे. या सीसीटीव्‍हीच्‍या आधारे चोरट्याला पकडणे अधिकच सोपे झाले आहे.

मंगेश संजय डवले (३२, रा. मुंगसरी ता. चिखली) यांनी चिखली पोलीस दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला आहे. त्‍यांच्‍या आईची तब्‍येत ठीक नसल्याने चिखलीतील खासगी दवाखान्यात भरती केले आहे. पाच जुलैला रात्री दहाला त्‍यांनी आईचा जेवणाचा डबा घरून आणला. मोटारसायकल (क्र. MH 28 AE 4329) डॉ. जयस्वाल यांच्‍या दवाखान्याजवळील प्रसन्न मेडिकलसमोर हँडल लाँक करून उभी केली होती. आईने जेवण केल्यानंतर ते तिथेच झोपले. सकाळी उठून मंगेश डवले दवाखान्याबाहेर आले असता त्‍यांना मोटारसायकल दिसली नाही. त्‍यांनी प्रसन्न मेडिकलच्‍या मालकांना विचारले असता त्‍यांनी आपण सीसीटीव्हीमध्ये पाहू, असे म्हणून सीसीटीव्हीचे फूटेज दाखवले असता अंदाजे २० वर्षे वयाचा तरुण मोटारसायकल चोरून नेताना दिसला.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: