क्राईम डायरी

दारूच्‍या नशेत तरुणाची आत्‍महत्‍या, खामगावच्‍या पळशी बुद्रूकची घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दारूच्‍या नशेत 25 वर्षीय तरुणाने घरातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना पळशी बुद्रूक (ता. खामगाव) येथे 21 फेब्रुवारीला साडेतीनच्‍या सुमारास समोर आली.
गोपाल रामचंद्र धनोकार असे आत्‍महत्‍या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्‍याने राहत्‍या घरात दारूच्‍या नशेत टिनपत्राच्‍या लाकडी बल्लीस गळफास घेतला. आत्‍महत्‍येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी गणेश सुगदेव धनोकार (56) यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्‍मात मृत्‍यूची नोंद केली आहे. तपास एनपीसी राजेश गाडेकर करत आहेत. तक्रार हेकाँ संजय काकडे यांनी दाखल करून घेतली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: