क्राईम डायरी

दिराकडून भावजयीचा विनयभंग; भरोसा येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतीच्या कारणावरून वाद होऊन दिराने भावजयीचा विनयभंग केल्याची तक्रार अंढेरा पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. पीडित 33 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश पुंजाजी सिरसाट (40), भारत राजू सिरसाट (28), अर्चना गणेश सिरसाट (35, सर्व रा. भरोसा, ता. चिखली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 25 जानेवारी राजी दुपारी 2 वाजता पीडित 33 वर्षीय महिलेला या तिन्ही जणांनी शेतीच्या कागदपत्रांच्या कारणावरून लोटपोट केली व शिवीगाळ करून अंगावरील साडी लोकांसमक्ष सोडून विवस्त्र करून अपमानित केल्याची तक्रार महिलेने दिली आहे. याप्रकरणी काल 26 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: