क्राईम डायरी

दिराने मांडला विवाहितेचा छळ; पत्‍नीसोबत मिळून घेत होता सोने चोरीचा आळ!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा शहरातील जनता कॉलनीतील रहिवासी 34 वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी दीर व त्‍याच्‍या पत्‍नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सौ. भारती योगेश खेडकर यांनी नांदुरा पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे की, माझे लग्न योगेश अनंतराव खेडकर यांच्याशी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे शेगाव येथे झाले आहे. माझे दीर प्रशांत अनंतराव खेडकर व त्‍यांची सुवर्णा हे माझ्यावर वारंवार सोने चोरीचा आळ घेत आहेत. तूच तुझ्या आई- वडिलाकडे सोने घेऊन गेली, असे म्‍हणून शिविगाळ करून चापटबुक्‍क्यांनी त्‍यांनी मारहाण केली. शारीरिक व मानसिक त्रास दिला. या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी दीर प्रशांत व त्‍याची पत्‍नी सुवर्णा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: