क्राईम डायरीमुख्य बातम्या

दिवसभरात पाचवी आत्‍महत्‍या!; गावातील काहींशी वाद झाल्यानंतर घरात जाऊन घेतले विष!; चांधईतील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विष घेऊन ४६ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना चांधई (ता. चिखली) येथे आज घडली.भगवान सुखदेव गवई रा चांधई ता चिखली असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.गावातील काहींसोबत त्यांचा आज दुपारी वाद झाला होता तेव्हा दुपारी 2 च्या सुमारास त्यांनी त्यांच्या घरात जाऊन विषारी औषध प्राशन केले.त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे दाखल करण्यात आले.मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: