बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

दीर्घकाळ एकाच सांझ्यात ठाण मांडून बसणाऱ्या १४ तलाठ्यांची बदली

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनेक महिने एकाच सांझ्यात ठाण मांडून बसणाऱ्या बुलडाणा उप विभागातील १४ तलाठ्यांच्या अखेर बदल्या झाल्या आहेत. बुलडाणा उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले.

तलाठ्यांच्या बदलीचे अधिकार संबधित उपविभागीय अधिकारी ( महसूल ) यांना असतात. या अधिकाराचा वापर करून व २९ जुलैच्या शासन निर्णयाचे पालन करत “एसडीओ’ श्री. हांडे यांनी १४ तलाठ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

अशा आहेत बदल्या…
आर. आर. सय्यद धोडप येथून नांद्रा कोळी (ता. बुलडाणा), कुमारी एन. व्ही. दळवी वरवंड येथून सव (ता. बुलडाणा), जी. आर. देशमुख बुलडाणा भाग १ मधून डोमरुळ (ता. बुलडाणा), जी. के. राजपूत कोलवड येथून बुलडाणा भाग १, एन. यू अहिर सव येथून कोलवड (ता. बुलडाणा), ए. टी. जाधव केळवद येथून सावरगाव डुकरे (ता. चिखली), सौ. ए. एस. शिंगणे सावरगाव डुकरे येथून अंबाशी भाग १ (ता. चिखली), एस. ए. ताठे डोमरुळ येथून पिंपळगाव सराई (ता. बुलडाणा), एस. ए. पवार इसरूळ मंगरूळ येथून केळवद (ता. चिखली), ए. व्ही. पांढरे गागलगाव येथून धोडप (ता. चिखली), ए. ओ. तुरे शेलसूर येथून अमोना (ता. चिखली), ए. बी. खेडेकर उंद्री येथून अमडापूर भाग ३, कुमारी आर. व्ही. पाटील नांद्रा कोळी येथून वरवंड (ता. बुलडाणा) एस. बी. कटक अमडापूर भाग ३ येथून गागलगाव.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: