क्राईम डायरी

दुकान उघडे ठेवणाऱ्या फर्निचर दुकानदारावर अमडापूर पोलिसांनी केली कारवाई,गुन्हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या फर्निचर दुकानदाराविरुद्ध अमडापूर  (ता. चिखली) पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काल, 22 एप्रिल रोजी सायंकाळी पेट्रोलिंग करत असताना मंगरूळ नवघरे ते कळंबेश्वर रस्त्यावर पोलिसांना सचिन सुनील जाधव (रा. मंगरूळ नवघरे, ता. चिखली) यांचे फर्निचरचे दुकान उघडे दिसले. काही गिऱ्हाईकसुद्धा तिथे होते.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उल्लंघन केल्याप्रकरणी जाधव यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: