दुचाकीस्वाराला धडक देऊन वाहन पसार; मेहकरच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू; आज सायंकाळची घटना

मेहकर (अनिल मंजूळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मेहकर- चिखली रोडवरील नांद्रा धांडेजवळ आज, 4 जानेवारीला सायंकाळी सहा वाजता घडली. दीपक सखाराम पाठक (41, रा. मेहकर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. …
 

मेहकर (अनिल मंजूळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मेहकर- चिखली रोडवरील नांद्रा धांडेजवळ आज, 4 जानेवारीला सायंकाळी सहा वाजता घडली. दीपक सखाराम पाठक (41, रा. मेहकर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चुराडा झाला आहे. तपास ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सानप करत करत आहेत.