क्राईम डायरीमुख्य बातम्या

दुचाकी झाडाला धडकून मजूर ठार, संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भरधाव दुचाकी झाडाला धडकून झालेल्‍या अपघातात मजुराचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना खेर्डा (ता. संग्रामपूर) गावाजवळ आज, 28 फेब्रुवारीला दुपारी साडेचारच्‍या सुमारास घडली.

राजेश बळीराम डाखोडे (40, रा. काथरगाव, ता. संग्रामपूर) असे ठार झालेल्याचे नाव आहे. काथरगाव (पिंप्री) येथील रहिवासी परंतु कामानिमित्त झाडेगाव- मानेगाव येथे विट भट्टीवर कामासाठी कुटुंबासह राजेश राहत होता. काथरगावात वार्षीक धार्मिक कार्यक्रमासाठी कुटुंबासह तो आला होता. धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर पत्नी व मुलांना गावात सोडून काथरगाव येथून तो दुचाकीने विट भट्टीच्या कामासाठी जात असताना वरवट बकाल – जळगाव रोडवर खेर्डा गावाजवळ दुचाकीची झाडाला धडक होऊन त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी , २ मुली १ मुलगा भाऊ , आई, वडिल असा मोठा परिवार आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: