क्राईम डायरीमुख्य बातम्या

दुर्दैवी ब्रेकिंग! !! हतेडी खुर्द हादरले… मातेने मुलासह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली!!

 बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः बुलडाणा तालुक्यातील हतेडी खुर्द गाव आज, 18 मार्चला सकाळी अक्षरशः हादरले! ‘त्या ‘ दृष्याने अगदी पाषाण हृदयी व्यक्तीही हळहळला!!  गावातील आयाबहिणींनी हंबरडे फोडले.

याचे कारण व घटनाक्रमच तसा होता. गावातील एका महिलेने आपल्या पोटच्या गोळ्यासह एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांचे विहिरीत एकमेकाला बिलगून तरंगणारे  मृतदेह पाहून गावगाडा हादरून जाणे स्वाभाविकच ठरले. बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस आल्यावर  पंचनामा, मृतदेह बाहेर काढणे हे सर्व सोपस्‍कार पार पडले. रुपाली हरिदास चव्हाण व समर्थ हरिदास चव्हाण अशी या दुर्दैवी मायलेकांची नावे. 17 मार्चला संध्याकाळी हे घरातून ( कायमचे) निघाले. त्यानंतर घरी परतलेच नाही! यामुळे पती हरिदास व अन्य नातेवाईकांनी शोधाशोध केला. आज सकाळी त्यांचे मृतदेह शिवारातील गट क्रमांक 24 मधील सीताराम चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत आढळले आणि त्यांच्यासह गावच हादरले,  बधिर झाले, सुन्‍न झाले!

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: