बुलडाणा (घाटावर)

दुसरबीड ः डॉ. बाबासाहेबांच्‍या पुतळ्याजवळील सुशोभिकरणासाठी तरुणाई सरसावली!

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः दुसरबीड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सुशोभिकरण करण्यासाठी दुसरबीड येथील महामानव फाउंडेशन सरसावली आहे. पुतळ्यासमोरील प्रांगणात सुशोभिकरण करण्यात आली आहे. स्वखर्चातून जेसीबी लावून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. जिथे पाणी साचते तिथे मुरूम माती आणून टाकली. श्रमदानातून गाजर गवत सुद्धा काढून टाकले. यावेळी महामानव फाऊंडेशनचे सचिन मनोहर खंदारे, पप्पू खंदारे, मिलिंद मोरे, प्रवीण घेवंदे, सचिन श्यामराव खंदारे, नीलकंठ चित्तेकर, सयाजी खरात, संदीप खंदारे, सुरज कुटे, आकाश इंगळे, अनिकेत साळवे आदींनी पुढाकार घेतला.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: