क्राईम डायरीमुख्य बातम्या

दुसरे लग्न करायचे म्हणून पत्नीचा करत होता छळ; न्यायालयाने सहा महिने जेलमध्ये धाडले!; मोताळा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुसर्‍या लग्नास परवानगी मागून ती दिली जात नसल्याने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणार्‍या व पैशांची मागणी करणार्‍या पतीला 6 महिने शिक्षा व 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सासूलाही 1 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून, इतर दोन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. मोताळा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पंकज देशपांडे यांनी ही शिक्षा सुनावली.

रोहिणखेड (ता. मोताळा) येथील सौ. जयश्री उर्फ रत्ना दिनेश सपकाळ यांनी 28 जून 2014 रोजी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी पती दिनेश, सासू वत्सलाबाई, दीड गजानन व चंद्रकांत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. जयश्रीला एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा जन्मतःच दिव्यांग असल्याच्या कारणावरून दिनेशला दुसरे लग्न करायचे होते. त्यासाठी तो आणि सासरचे जयश्रीचा छळ करायचे. माहेरवरून 5 लाख रुपये घेऊन ये म्हणून छळ करायचे. तत्कालिन ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. तुषार उदयकार यांनी काम पाहिले. गुन्ह्याबाबत सहायक पोलीस निरिक्षक चंद्रकांत ममताबादे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ विलास कुंदेटकर यांनी सहकार्य केले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: