बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

दुसऱ्यांदा बदल! दूध व्यवसायासाठी संध्याकाळीही 2 तास वाढविले!! विक्रेत्यांना 13 तास वाटपाची मुभा

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कडक निर्बंधांपाठोपाठ काढण्यात आलेल्या किमान वेळांच्या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा बदल केलेत!  त्यानुसार डेअरी चालकांना संध्याकाळी आणखी 2 तासांची वाढीव वेळ देण्यात आली असून, विक्रेत्यांना वाटपासाठी 13 तासांची वेळ देण्यात आली आहे.

यापूर्वी 19 एप्रिलच्या आदेशात अत्यावश्यक सेवांसह पेट्रोलपंपांना सकाळी 10 ते दुपारी 2 अशी वेळ ठरविण्यात आली होती. त्यानंतर 20 एप्रिलला यात बदल करून सकाळी 7 ते 11 अशी वेळ देण्यात आली. आज या आदेशात केवळ दूध व्यवसायासाठी  बदल करण्यात आला. यानुसार डेअरी चालकांना आता संध्याकाळी 6 ते 8 अशी वेळ वाढवून देण्यात आली आहे. तसेच किरकोळ दूध विक्रेत्यांना सकाळी 7 ते रात्री 8 वाजेदरम्यान घरपोच दूध वाटप करण्यास मुभा देण्यात आली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: