क्राईम डायरीमुख्य बातम्या

दुसऱ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्‍ट, धाडच्‍या तरुणाविरुद्ध गुन्‍हा दाखल, प्‍लंबरने दिली होती तक्रार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फेसबुकवर दुसऱ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्‍ट टाकणाऱ्या धाड येथील तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. या प्रकरणात धाड येथील ३४ वर्षीय प्‍लंबरने तक्रार दिली होती.

शुभम ऋषीनाथ निकम (रा.वॉर्ड क्रमांक २, मारोती मंदिराजवळ, धाड) असे संशयिताचे नाव आहे. तक्रारकर्ता प्‍लंबर आझाद चौकात असताना त्‍याला लोकांच्‍या चर्चेतून कळले की फेसबुक अकाऊंटवर आपल्या धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्‍ट टाकण्यात आल्या आहेत. शुभम संभाजी राव नावाचे हे खाते प्‍लंबरने तपासले असता भावना दुखावणाऱ्या दोन पोस्‍ट दिसल्या. त्‍याने पोस्‍टचा स्क्रिनशॉट घेऊन हे फेसबुक खाते कोण चालवते हे याची माहिती घेतली असता गावातीलच शुभम निकमचे नाव समोर आले. प्‍लंबरने धाड पोलीस ठाणे गाठून शुभमविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: