क्राईम डायरी

देऊळगाव महीत विकत होता गोमांस!; पोलिसांनी पकडले

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गोमांस विक्री करणाऱ्यावर देऊळगाव मही पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी आज, 21 एप्रिलला सकाळी 10 वाजता कारवाई केली.

देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथील गारखेड रोडवर शेख इरफान शेख आयुब (६५) हा गोमांस विकत होता. महादेव कुटे यांनी त्‍याची माहिती देऊळगाव मही पोलिसांना दिली. पोलिसांनी छापा मारून त्‍याच्‍याकडील ६५ किलो मांस (किंमत ६५००), दोन सुरे (किंमत १००), वजन काटा (किंमत १२००) असा एकूण ७८०० रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात शेख इरफानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: