बुलडाणा (घाटावर)

देऊळगाव राजात उद्या भरणार नाही आठवडे बाजार!

देऊळगाव राजा (राजेश कोल्‍हे) ः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने देऊळगाव राजात उद्या शनिवारी (दि.27) भरणारा आठवडे बाजार व गुरांचा बाजार रद्द करण्यात आला आहे. नगर परिषद प्रशासनातर्फे ही माहिती देण्यात आली.

तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्‍णांची संख्या वाढतच चालली आहे. शहर व ग्रामीण भागामिळून आतापर्यंत २९४ रुग्ण आढळले आहेत. मागील आठवड्यातील शनिवारी आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे उद्या आठवडी बाजारच भरविण्यात येणार नाही. शहरातील अत्‍यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेही बंद राहणार आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: