क्राईम डायरीमुख्य बातम्या

देऊळगाव राजात होंडा शोरूम फोडले; नव्या कोऱ्या दुचाकीसह साडेतीन लाखांची चोरी

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा शहरातील जालना रोडवर होंडा कंपनीचे शोरूम असलेले सान्वी मोटर्स फोडून नव्‍या कोऱ्या दुचाकीसह 3 लाख 55 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. काल रात्री उशिरा या प्रकरणी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन जालना रोडवर रामविजय भालचंद्र नरोडे यांचे सान्वी मोटर्स व होंडा  कंपनीचे दुचाकीचे शोरूम आहे. काल दुपारी ते शोरूमला गेले असता त्यांना शोरूमच्या  मागच्या दरवाजाचे लॉक तुटलेले दिसते. त्यामुळे दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. काऊंटरमध्ये ठेवलेले नगदी 2 लाख दहा हजार रुपये, दुसऱ्या काऊंटरमधील 30 हजार असे एकूण 2 लाख 40 हजार रोख व होंडा कंपनीची नवी कोरी सीबी शाईन गाडी, लॅपटॉप, चारचाकी वाहनाचा इसीयू असा एकूण 3 लाख 55 हजार 354 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार देऊळगाव राजा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: