क्राईम डायरीमुख्य बातम्या

देऊळगाव राजा ः हभप चित्ते गुरुजींची आत्महत्या; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घराजवळीलच गुलमोहराच्या झाडाला गळफास घेऊन हभप सखाराम श्रीपतराव चित्ते यांनी आत्महत्या केली. ही घटना देऊळगाव राजा- पिंपळगाव चिलम खा रोडवरील शेतात 16 फेब्रुवारीला पहाटे चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
चित्ते यांचे शेतात घर आहे. बर्‍याच दिवसांपासून शेजारी लोकांसोबत त्यांचा जमिनीचा वाद सुरू आहे. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार कैलास शेषराव टाले यांनी देऊळगाव राजा पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी प्रभाकर खंडागळे, रामदास खंडागळे. चंद्रभाबाई खंडागळे, बबन खंडागळे (रा. देऊळगाव राजा), गणेश आनंदराव जाधव (रा. जालना) यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली. तपास ठाणेदार संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक किरण खाडे, पोलीस उपनिरिक्षक संदीप सोने, नितीन जाधव, विजय किटे, विजू गिते करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: