क्राईम डायरीमुख्य बातम्या

देऊळगाव राजा बाजार समितीत चोरट्यांचा धुडगूस; महिन्याची उसंत घेतल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी डल्ला!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये चोरट्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला लक्ष्य केले होते. जानेवारीत उसंत घेतल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी पुन्हा बाजार समितीत धुडगूस घालून दोन दुकानांतील 15 हजारांचे साहित्य चोरून नेले आहे. वाढत्या चोर्‍यांच्या घटनामुळे व्यापारी धास्तावले आहेत.


प्रमोद सावजी यांचे स्वतिक अडत व भंसाली यांची अडत दुकान काल, 1 फेब्रुवारीच्या रात्री चोरट्यांनी मागील बाजूची खिडकी तोडून फोडले. सावजी यांच्या दुकानातून नगदी 6 हजार व भंसाली यांच्या अडत दुकानातून 9 हजार रुपये असे एकूण 15 हजार रुपये रोख चोरट्यांनी चोरून नेले आहे. दोन्ही अडत दुकानांतील कागदपत्रे, वह्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान चोरट्यांनी केले आहे. या प्रकरणी प्रमोद सावजी व भंसाली यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
वाचमन असतो गायब…
रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी बाजार समितीतर्फे वाचमन ठेवण्यात आला आहे. मात्र वाचमन गायब राहतो. त्यामुळे बाजार समितीतील दुकाने वारंवार फुटत आहेत. मागच्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात बाजार समितीमधील सहा अडत व दोन किराणा दुकाने फुटली होती. याकडे बाजार समितीने लक्ष द्यावे, अशी मागणी अडत दुकानदारांकडून होत आहे. रात्रीच्या वेळी कायमस्वरुपी वाचमन ठेवण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. व्यापारी व किराणा दुकानदारांनी बाजार समिती सचिव किशोर म्हस्के यांच्याकडे तक्रार केली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: