बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

देवा रे देवा… लसीकरणासाठी ज्‍येष्ठांना चढावे लागतात तीन मजले! ; बुलडाणा जिल्हा रुग्‍णालयातील चित्र

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असतानाच लसीकरणाला गती मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवरही प्रयत्‍न करण्यात येत आहेत. जिल्हा रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र लसीकरणासाठी तिसऱ्या मजल्यावर जावे लागत असल्याने ज्‍येष्ठांची दमछाक होत आहे. अनेक वृद्धांना तर एवढ्या पायऱ्या चढताना मध्येच दम लागत आहे.

दोन वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद आहे. त्यामुळे तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांचा उपयोग करावा लागतो. सध्या 45 वर्षे वयोगटावरील नागरिकांना लस देण्यात येत आहेत. अनेक वृद्ध लाभार्थी लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालयात येत आहेत. मात्र लस घेण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर जावे लागते. त्‍यामुळे एवढे मजले लढून जाणे अनेकांना शक्‍यही होत नाही. ते तिथूनच माघारी फिरत आहेत. लसीकरणासाठी प्रशासन मोठी तयारी करत असताना जिल्हा रुग्णालयात याबाबत उदासीनता दिसत आहे. लसीकरणाची व्यवस्था ही तळमजल्यावर करण्यात यावी, अशी मागणी वृद्ध नागरिकांकडून करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी उपलब्ध आहेत. एका दिवसाला 300 ते 400 लाभार्थी लस घेतात.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: