क्राईम डायरीमुख्य बातम्या

दोन भाऊ मागून आले… तिला म्हणाले, चल गाडीवर बस..! 25 वर्षीय तरुणीची पोलिसांत धाव; बुलडाणा शहरातील खळबळजनक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दोन सख्ख्या भावांनी घराकडे निघालेल्या तरुणीच्‍या मागून येत तिला मोटारसायकलवर बसायला सांगितले. तिने नकार देताच मारहाण केल्याची घटना बुलडाण्यात समोर आली आहे. तरुणीने भावाला बोलावून घेतले असता त्‍यालाही दोघांनी मारहाण केली. या प्रकरणी तरुणीच्‍या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांच्‍या माहितीनुसार, जुनागाव शिवाजीनगरात राहणारी तरुणी काल सकाळी 6:39 वाजता नगरपरिषदेच्या मागील रस्त्याने घराकडे जात होती. त्याच वेळी तरुणीच्या घराजवळच राहणारे आकाश अर्जुन घट्टे (25), उमेश अर्जुन घट्टे (30) हे दोघे भाऊ मागून मोटारसायकल घेऊन आले. दोघांनी तिला गाडीवर बसायचा आग्रह केला. तिने नकार दिला असता तिचा वाईट उद्देशाने हात व केस धरत जबरदस्ती गाडीवर बसायला सांगितले. तिने नकार दिल्यावर तिला मारहाण केली. हा प्रकार तरुणीने तिच्या भावाला फोन करून सांगितल्यावर तरुणीचा भाऊ घटनास्थळी आला. तेव्‍हा दोन्ही भावांनी बहीण- भावाला मारहाण केली. तुझी आई घरी एकटीच आहे तिचा जीव घेऊ, अशी धमकी तरुणीला दिली. तरुणीच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आकाश व उमेश (दोघेही रा. जुनागाव ,शिवाजीनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: