बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

दोन महिन्यांपासून पगारच मिळेना! 700 पालिका कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी!! गत वर्षाअखेर मिळाले होते वेतन

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नगराच्या विकासात महत्‍वाचा वाटा असणारे व करसंकलनाच्या माध्यमाने पालिकेला लाखो रुपये मिळवून देणाऱ्या जिल्ह्यातील कमीअधिक 700 नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर राज्यातील आघाडी सरकारने उपासमारीची व आपली पत गमावण्याची वेळ आणलीय! याचे कारण मागील 2 महिन्यापासून त्यांनी पगारच पाहिला नाहीये !

बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, मेहकर, सिंदखेडराजा, लोणार, खामगाव, मलकापूर, नांदुरा नगरपरिषदा व मोताळा, संग्रामपूर नगर पंचायत मिळून सातएकशे कर्मचारी, शिक्षक व सफाई कामगार कार्यरत आहेत. नियमित कामाबरोबरच शहराच्या विकासात आपल्यापरीने हात लावत व विविध सेवा शुल्क, करवसुली यांच्या माध्यमाने पालिकेला भरीव उत्पन्‍न मिळवून देतात. अशा या शेकडो कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांपासून पगारच मिळालेला नाहीये. यामुळे ते कमालीचे अडचणीत आले असून, त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. मागील डिसेंबर 2020 मध्ये पगार मिळाल्यानंतर त्याना पगाराचे दर्शनच झाले नाही. चालू महिन्याचा पगार देखील न होण्याची चिन्हे आहेत. आजअखेर पगारासाठी ग्रँटच काय त्याची इंटिमेशन देखील मिळाली नाही. पूर्वसूचना मिळाल्यावरही ग्रांट मिळण्यात किमान आठवडा लागतो. त्यामुळे शेकडो कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: