बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

दोन महिलांचा कोरोनाने मृत्‍यू; बाधितांचा आकडा 21 हजार पार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 7 मार्चला कोरोनाने दोन महिलांचा मृत्‍यू झाल्‍याने एकूण बळींचा आकडा 200 वर गेला आहे, तर दिवसभरात 379 नवे पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळल्‍याने बाधितांचा आकडा 21304 गेला आहे. 338 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज मिळाला असून, आजवर बरे झालेल्यांचा आकडा 18435 आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1947 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1568 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 379 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 274 व रॅपिड टेस्टमधील 105 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 875 तर रॅपिड टेस्टमधील 693 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

शेगाव तालुका : गौलखेड 1, घुई 1, चिंचोली 13, शेगाव शहर : 20, बुलडाणा शहर : 40, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 3, तांदुळवाडी 1, पळसखेड भट 1, चिखली शहर : 28, चिखली तालुका : लोणी लव्हाळा 1, अमडापूर 2, किन्होळा 1, शेलगाव 1, चांधई 1, सवणा 1, मेरा 1, शिरपूर 2, खामगाव शहर : 28, खामगाव तालुका : शिर्ला नेमाने 1, सुटाळा बु 1, आडगांव 2, श्रीधर नगर 12, विहिगाव 1, हिवरखेड 9, टेंभुर्णा 3, नांदुरा शहर : 32, नांदुरा तालुका : विटाळी 4, कोळंबा 1, तरवाडी 2, शेंबा 1, वडनेर 5, मलकापूर शहर : 21, मलकापूर तालुका : कुंड खु 2, वडजी 1, वाघोळा 1, विवरा 17, दाताळा 1, तालवाडा 6, देऊळगाव राजा तालुका : आळंद 1, अंढेरा 3, कुंभारी 2, सुरा 2, सिनगाव जहागीर 4, नारायणखेड 1, जांभोरा 1, निमखेड 1, दगडवाडी 2, पिंपळगाव 1, देऊळगाव मही 4, पिंप्री नंदाळे 2, देऊळगाव राजा शहर : 18, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 3, गाडेगाव खुर्द 1, मोताळा तालुका : पिंपळगाव देवी 14, धामणगाव बढे 4, पोफळी 1, गोतमारा 4, गोलर 2, पिंपळगाव गवळी 7, मोताळा शहर : 2, सिंदखेड राजा शहर : 6, सिंदखेड राजा तालुका : जऊळका 1, दुसरबीड 3, शिवणी टाका 1, सवडत 1, शेलगाव काकडे 1, मलकापूर पांग्रा 1, सुजलगाव 1, रताळी 3, मेहकर तालुका : अंत्री देशमुख 1, जानेफळ 2, हिवरा साबळे 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : असोला 1, मूळ पत्ता जाळीचा देव जि. जालना 1, यवतमाळ 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 379 रूग्ण आढळले आहे. उपचारादरम्यान डोंगरखंडाळा ता. बुलडाणा येथील 72 वर्षीय महिला, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, बुलडाणा येथील 65 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

338 रुग्‍ण झाले बरे

आज 338 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : स्त्री रुग्णालय 16, सिद्धीविनायक हॉस्पीटल 13, अपंग विद्यालय 42, मुलींचे वसतिगृह 1, देऊळगाव राजा : 37, चिखली : 21, मेहकर : 43, नांदुरा : 44, जळगाव जामोद : 9, सिंदखेड राजा : 4, संग्रामपूर : 4, मलकापूर : 26, लोणार : 10, खामगाव : 41, शेगाव : 26

7581 नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत

आजपर्यंत 149305 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 18435 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 7581 नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 21304 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रग्णालयात 2669 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 200 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: