क्राईम डायरीमुख्य बातम्या

दोन महिलांचा मृत्यू, एकीची आत्महत्या, दुसरीचे कारण कळेना… खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विहिरीत बुडून 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना नागापूर (ता. खामगाव) येथे काल, 12 फेब्रुवारीच्या रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. सौ. रत्नकला विलास धानोरे असे या महिलेचे नाव आहे. सहदेव हरिभाऊ धानोरे यांनी खामगाव ग्रामीण पोलिसांना कळवल्याने पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. सौ. रत्नकला या नागापूर शिवारातील मनोज महादेव बर्‍हाटे यांच्या शेतातील विहिरीत बुडालेल्या आढळल्या. ही घटना अपघात की आत्महत्या हे वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नाही. गुन्हा एएसआय आनंद वाघमारे यांनी दाखल करून घेतला तर तपास पोहेकाँ मनोज चव्हाण करत आहेत.
गळफास घेऊन आत्महत्या
खामगाव ः खामगाव तालुक्यातील पारखेड येथे संगिता पुंडलिक पुराणे या 40 वर्षीय महिलेने राहत्या घरात छताला साडीच्या साह्याने गळफास घेतला. ही घटना 11 फेब्रुवारीला दुपारी घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पती सुनील पुराणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: