क्राईम डायरीमुख्य बातम्या

दोन युवकांची आत्‍महत्‍या; एकाने घेतला गळफास, दुसऱ्याने विष!; पेरणी वाया गेल्याचा बळी, बुलडाणा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जनुना (ता. बुलडाणा) येथे काल, ११ जुलैच्‍या रात्री ११ च्‍या सुमारास घडली. अरुण कौतिकराव पवार (३४, रा. जनुना, ता. बुलडाणा) असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे.

अरुण पवार यांचे बुलडाणा- अजिंठा रोडवर धावडा येथे मोटारसायकल दुरुस्तीचे गॅरेज होते. सततच्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर आर्थिक ताण होता. गॅरेजसोबतच वडिलांच्या नावावर असलेल्या दोन एकर शेतीचे कामही ते पाहत होते. यंदा त्यांनी दुबार पेरणी केली होती. मात्र आतापर्यंत अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केली नाहीत. त्यामुळे चिंताग्रस्त अरुण पवार यांनी रात्री ११ च्या सुमारास घरातच गळफास घेतला. ही बाब घरातील लोकांच्या लक्षात येताच धाड पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलडाण्याच्‍या जिल्हा सामान्य रुग्‍णालयात पाठवला.

विष प्राशन करून आत्महत्या
विष घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना रुईखेड मायंबा (ता. बुलडाणा) येथे काल, ११ जुलैच्‍या रात्री घडली. गजानन बळीराम फोलाने (३४)असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. फोलाने यांनी रात्री ११ ला राहत्या घरी विष घेतले. ही बाब लक्षात येताच त्याचे भाऊ विजय बळीराम फोलाने यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र त्‍यांचा मृत्‍यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: