बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

धक्कादायक ब्रेकिंग! ‘पोटा’त झाला महास्फोट!! 77 घायाळ; संपूर्ण गाव ‘जेरबंद’

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील पोटा हे गाव आज, 12 एप्रिलला महास्फोटाने हादरले! यामुळे तब्बल 77 जण ‘घायाळ’ झाले आहेत. परिणामी संपूर्ण गाव ‘सिल’ करण्यात आले आहे. हा स्फोट एखाद्या स्फोटकाचा नव्हता तर तो होता कोरोनाचा! आता या चिमुकल्या गावात कोरोनाचा स्फोट अचानक कसा झाला, असा धक्कादायक सवाल कोणाच्याही मनात येणे स्वाभाविक आहे, तर त्याचे झाले असे, की कोरोनाचा धोका रोखण्यासाठी तहसील, आरोग्य विभाग व अन्य यंत्रणांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे, त्‍याचा एक भाग म्हणून पोटा गावात आज कोरोनविषयक तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी 145 ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली, पैकी दहा, पंधरा नव्हे तब्बल 77 गावकरी कोरोना पॉझिटिव्ह निघाले! या कोरोना महास्फोटाने हे गावच नव्हे तर पंचक्रोशीतील गावेही हादरली! या स्फोटानंतर संपूर्ण पोटा गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सर्व गावकऱ्यांची होणार चेकिंग

दरम्यान आज तपासणी करण्यात आलेल्या गावकऱ्यांपैकी तब्बल 54 टक्के व्यक्ती कोविड बाधित निघाल्याने काहीवेळासाठी प्रशासन देखील 7700 व्होल्टेजचा धक्का लागल्यासारखे झाले! मात्र यानंतर तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांनी हिंमत दाखवत तात्काळ उपाय योजनांसाठी सभा घेतली. उद्या मंगळवारपासून संपूर्ण गावकऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावकऱ्यांनी भयभीत न होता संयम दाखवून या संकटाचा सामना करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून दिलासा देण्यात आला.

जिल्ह्यात तिघांचा बळी

जिल्ह्यात आज उपचारादरम्यान शिवाजीनगर, खामगाव येथील 75 वर्षीय पुरुष, पोटा ता. नांदुरा येथील 45 वर्षीय पुरुष व वडगाव ता. जळगाव जामोद येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नव्‍या 341 बाधितांची भर पडली असून, 863 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1880 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1539 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 341 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 168 व रॅपिड टेस्टमधील 173 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 489 तर रॅपिड टेस्टमधील 1050 अहवालांचा समावेश आहे.

जिल्ह्यात पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 16, बुलडाणा तालुका :  पाडळी 2, हतेडी खुर्द 3, अजिसपूर 1, जांभरून 1, शिरपूर 1,  खामगाव शहर : 24,  खामगाव तालुका : गारडगाव 1, टाकळी 1, सुटाळा 2,  नांदुरा तालुका : आलमपूर 3,  खुरकुंडी 2, माटोडा 1, डीघी 1, पोटा 1, शेळगाव 1, आंभोडा 1, शेलगाव मुकुंद 1, वसाडी 1, पोटळी 1, अवधा 5,  मलकापूर शहर : 38, मलकापूर तालुका :  उमाळी 2,  बहापुरा 1, हरसोडा 5, अनुराबाद 1, घिर्णी 1, बेलाड 1, निंबारी 1, दाताळा 1, काळेगाव 1, माकनेर 1, धोंगर्डी 1, वाघुड 2. चिखली शहर : 10, चिखली तालुका :  शेलूद 1, करतवाडी 1, मेरा बुद्रूक 1, शेलसूर 1, शेलगाव आटोळ 2, धोत्रा भनगोजी 1, सायाळा 1, उंद्री 1,  सिंदखेड राजा शहर : 6,  सिंदखेड राजा तालुका :  साखरखेर्डा 16, शेंदुर्जन 3, दुसरबीड 3, गुंज 1, वारोडी 2,  किनगाव राजा 1, पळसखेड चक्का 1, सावखेड तेजन 2,  मोहाडी 1, वर्दडी 1, सायाळा 2,  वसंतनगर 1, सोनाटी 1, ताडशिवणी 1, विझोरा 1, पिंपळगाव 1, पिंपळगाव सोनारा 1, दरेगाव 1, वाखरी 1, वाघोरा 1, मोताळा तालुका :  धामणगाव बढे 11,  बोराखेडी 1, आव्हा 2,  रोहिणखेड 1, वडगाव 1, लिहा 3, किन्होळा 1, सावरगाव 1, रिधोरा 1, महाळुंगी 1, खेडी 1, राजूर 1, तालखेड 1, मोताळा शहर : 2,  शेगाव शहर : 7,  शेगाव तालुका : पळशी बुद्रूक 1, टाकळी विरो 1, संग्रामपूर शहर :1, संग्रामपूर तालुका : पळशी झांशी 1,  देऊळगाव राजा शहर : 8, देऊळगाव राजा तालुका :  देऊळगाव मही 1, पाडळी शिंदे 1, खैरव 1, नारायनखेड 1, बोरखेडी 1, सिनगाव जहाँगिर1, लोणार शहर : 9, लोणार तालुका :  शारा 1, टिटवी 1,  मांडवा 1, देऊळगाव 1, बिबी 4, चोरपांग्रा 3, गायखेड 1, कुंडलास 1, तांबोळा 2, कुऱ्हा 1, लोणी 2, पळसखेड 2, वाघाळा 7, बिबखेड 1, जऊळका 1,  मेहकर शहर : 13,  नांदुरा शहर :10, जळगाव जामोद शहर : 8, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 6, वडगाव पाटण 1, पिंपळगाव काळे 2, भेंडवळ 1, निंभोरा 2, पळशी वैद्य 1, पळशी सुपो 3, आडोळ 2, तिवडी 1, वडगाव तेजन 1,  मूळ पत्ता निंबोरा ता. भुसावळ 2,  व्याळा ता. अकोला 1, जाफराबाद 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 341 रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात बळींचा आकडा 309 वर

आज 863 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.  आजपर्यंत 273099 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 40795 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 5584 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.  जिल्ह्यात आज अखेर एकूण 46530 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्‍णालयात 5426 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 309 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: