क्राईम डायरीमुख्य बातम्या

धक्कादायक! २ दिवसांत ८ तरुणी जिल्ह्यातून बेपत्ता!!; मोताळ्याच्या बसस्‍थानकावरून दोन सख्ख्या चुलत बहिणी गायब

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून काल, ७ जुलै आणि आज, ८ जुलैला एकदोन नव्‍हे तर तब्‍बल ८ तरुणी बेपत्ता झाल्याचे धक्‍कादायक वृत्त हाती आले आहे. मोताळा बसस्‍थानकावरून दोन सख्ख्या चुलत बहिणी गायब झाल्या.

दोन्‍ही बहिणी गायब…
मोताळा बसस्‍थानकावरून दोन सख्या चुलत बहिणी बेपत्ता झाल्या. आज ८ जुलैला एकीच्या आईने तर एकीच्या वडिलांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात मुली हरवल्याची तक्रार दिली आहे. कांचन विलास तायडे (१८)आणि जान्हवी कैलास तायडे (१९, दोघी रा. सारोळा पीर ता. मोताळा) अशी बेपत्ता झालेल्या बहिणींची नावे आहेत. काल ७ जुलैला दोघी त्यांचे भाऊ आकाश आणि रितेशसोबत मोटारसायकलवर बोराखेडी येथे गेल्या होत्या. बहिणींना बोराखेडी येथे सोडल्यावर दोन्ही भाऊ खामगावला गेले होते. कांचन बारावीच्या प्रॅक्टिकलसाठी प्रियदर्शनी विद्यालय बोराखेडी येथे आली होती तर जानव्हीला सीईटीचा फॉर्म भरायचा होता. आकाश आणि रितेश हे दोन्ही चुलतभाऊ संध्याकाळी सहाला खामगाववरून घरी परत आले. तेव्हा त्यांच्यासोबत बहिणी नव्हत्या. आकाशने कांचनला फोन लावला असता आम्ही दोघी बहिणी मोताळा बस स्टँडवर आहे. घरी यायला गाडी नाही तूआम्हाला घ्यायला मोताळ्याला ये, असे कांचनने सांगितले. तेव्हा रितेश बहिणींना घेण्यासाठी मोताळा बसस्‍थानकावर पोहोचला असता त्याला बहिणी दिसून आल्या नाहीत. कांचनचा मोबाइलसुद्धा स्वीच ऑफ दाखवत होता. आजूबाजूचा परिसर आणि नातेवाईकांकडे शोध घेऊनही दोघी बहिणी मिळून आल्या नाहीत.

अन्य सहा तरुणी इथून झाल्या बेपत्ता…
काल, ७ जुलैला पोलीस दफ्तरी नोंद झालेल्यांमध्ये रोहिणखेड येथील मोहिनी विक्रम इंगळे (१९, पोलीस ठाणे धामणगाव बढे), मोरखेड (ता. मलकापूर) येथील पल्लवी गोपाल सोळंके (१९, मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे), घिर्णी (ता. मलकापूर) येथील पूजा भागवत डाबेराव (२०, मलकापूर शहर पोलीस ठाणे), वरवट बकाल (ता. संग्रामपूर) येथील दीक्षा दिलीप भिडे (२०, तामगाव पोलीस ठाणे), देऊळगाव राजातील समता कॉलनीतील सोनी विनय पाल (२७, देऊळगाव राजा पोलीस ठाणे) तर आज, ८ जुलैला शेगावच्‍या माऊलीनगरातील प्रियांका बाबुराव रणित (२१, शेगाव शहर पोलीस ठाणे) हिची हरवल्याची नोंद झाली आहे. आन्वी (ता. चिखली) येथील जया रामेश्वर घेवंदे (४५, चिखली पोलीस ठाणे) आणि मलकापूर शहरातील सुभाषचंद्र बोसनगर येथील सतीश गंगाराम देसार (३७, मलकापूर शहर पोलीस ठाणे) हेही घर सोडून निघून गेले आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: