क्राईम डायरीबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

धक्‍कादायकच… दिवसभरात 199 नवे पॉझिटिव्‍ह रुग्‍ण, चिखलीत सर्वाधिक 32 रुग्‍ण; सोमठाण्यातील महिलेचा मृत्‍यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात आज, 17 फेब्रुवारीला गेल्‍या काही महिन्‍यांतील सर्वाधिक कोरोनाबाधित आढळले असून, तब्‍बल 199 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळल्‍याने प्रशासनानेही तातडीने संचारबंदी लागू करत उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यात चिखलीतील सर्वाधिक 32 रुग्‍णांचा समावेश आहे. दरम्‍यान, आजही कोरोनाने एक बळी घेतला असून, उपचारादरम्यान सोमठाणा (ता. चिखली) येथील 87 वर्षीय महिला रुग्‍णाचा मृत्यू झाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 640 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 441 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 199 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 162 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 37 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 271 तर रॅपिड टेस्टमधील 170 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 22, बुलडाणा तालुका : गिरडा 1, सागवन 1, डोंगरशेवली 1, चांडोळ 1, कोलवड 1, येळगाव 2, मलकापूर शहर : 16, देऊळगाव राजा शहर : 21, देऊळगाव राजा तालुका : दगडवाडी 1, अकोला देव 1, सिनगाव जहागीर 13, आळंद 1, पिंपळनेर 2, अंढेरा 1, सरंबा 1, डोढ्रा 1, जळगाव जामोद शहर : 2, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 2, झाडेगाव 1, संग्रामपूर तालुका : पळशी झाशी 1, एकलारा 1, सिंदखेड राजा शहर : 2, सिंदखेड राजा तालुका : रूम्हणा 2, चिखली शहर : 32, चिखली तालुका : अंत्री कोळी 1, अमडापूर 3, पेठ 1, खैरव 2, दहीगाव 1, सवणा 2, अंचरवाडी 3, तेल्हारा 1, नायगाव 1, खंडाळा मकरध्वज 1, मंगरूळ नवघरे 1, धोत्रा भणगोजी 1, हातणी 1, केळवद 1, मेरा बुद्रूक 1, खामगाव शहर : 19, खामगाव तालुका : लाखनवाडा 1, टेंभुर्णा 1, घाटपुरी 2, घाणेगाव 1, कदमापूर 3, सुटाळा खुर्द 1, मोताळा तालुका : तळणी 1, माकोडी 1, मेहकर शहर : 2, शेगाव शहर : 8, शेगाव तालुका : गायगाव 2, आडसूळ 1, मूळ पत्ता हिवरखेड ता. तेल्हारा जि अकोला 3, डोंगरगाव ता. बाळापूर जि. अकोला 1, जाळीचा देव ता. भोकरदन जि जालना येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 199 रूग्ण आढळले आहे.

42 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात
आज 42 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः चिखली : 11, देऊळगाव राजा : 9, बुलडाणा : अपंग विद्यालय 15, स्त्री रुग्णालय 3, सिंदखेड राजा : 4.

783 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 116392 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14263 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 1145 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 15225 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 783 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 179 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: