देश-विदेश

धक्‍कादायकच… नवरदेवाचा स्वतःच्याच लग्नात वहिणीवर बलात्कार!

भोपाळ : लग्नाला आलेल्या वहिणीवर नवरदेवानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना मध्य प्रदेशात घडली. नवरदेव हा पीडितेचा नात्याने मामेदीर लागतो, म्हणजे ती त्याची वहिणी झाली. त्याला त्याच्या बहिणीची ही साथ मिळाली.

पीडित विवाहिता मामे सासऱ्यांच्या मुलाच्या लग्नासाठी आली होती. या वेळी नवरदेवाच्या बहिणीने पीडितेला एका खोलीत बंद केले. त्यानंतर नवरदेवाने तिथे जाऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या बहिणीलाही अटक केली आहे. न्यायालयाने दोघांची तुरुंगात रवानगी केली. एकदा नव्हे, तर तीनदा नवरदेवाने पीडितेवर बलात्कार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. अनिलच्या लग्नासाठी पीडिता सांवेरला आली होती. तिच्या नणंदेने तिला एका खोलीत नेलं.

दरवाजा बंद करून घेतला. नवरदेव हाताला मेहंदी लावून बसला होता. तो मद्यधुंद अवस्थेत होता. नणंदेने पीडितेला जमिनीवर ढकलून पकडलं आणि नवरदेवाने बलात्कार केला. लग्नाच्या दिवशी पीडितेने कुठेही वाच्यता केली नाही; मात्र पीडिता शांत राहिल्याचा गैरफायदा पुन्हा भाऊ बहिणीनं घेतला. नणंदेने लग्नानंतर पुन्हा एकदा पीडितेला जवळच्या एका घरात जबरदस्तीने नेलं. तिथेही तिच्यावर दुसऱ्यांदा बलात्कार केला. लग्नाहून घरी परत आल्यानंतर विवाहितेची तब्येत बिघडली. तिने पतीला आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर दोघांनी फिर्याद दिली.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: