क्राईम डायरीमुख्य बातम्या

धक्‍कादायक! गेल्या 11 दिवसांत 19 महिला घरातून गायब!!; 15 तरुणींचा समावेश

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या 11 दिवसांत तब्‍बल 28 महिला, पुरुष गायब झाले असून, त्‍यांना शोधण्यासाठी पोलिसांनी प्रयत्‍न चालवले आहेत. धक्कादायक बाब म्‍हणजे यात चक्‍क 19 महिला असून, त्‍यातही 15 तरुणींचा समावेश आहे. आज, 11 एप्रिलला शेगाव तालुक्‍यातूनही नागझरी शिवारातील रहिवासी 46 वर्षीय संगिता मार्तंड दांदळे या बेपत्ता झाल्या आहेत.

बेपत्ता झालेल्या तरुणी

सोनू बबन अंभोरे (24, रा. मादनी, ता. मेहकर), राधा दगडू कांबळे (19, रा. एकलव्यनगर, बुलडाणा), वृषाली गजानन डोंगरदिवे (18, रा. गायरान सागवण, बुलडाणा), सौ. किरण मोहन ताले (24, रा. बोरी अडगाव, ता. खामगाव), अपर्णा सुनील गवळी (24, रा. भुतबंगला वॉर्ड नं.21, शेगाव), सौ. अलका संजय गोरे (24, रा. माळीपेठ, मेहकर), मनिषा अमोल वाळके (25, बेलगाव, ता. मेहकर), स्‍नेहल रामभाऊ धुरंधर (19, रा. तिघ्रा, ता. मोताळा), रुपाली राहुल सरदार (27, रा. घुटी, ता. मेहकर), कु. साधना विष्णूकांत खवले (19, रा. हिंगणा भोटा, ता. शेगाव), रेणुका राजू कासरवाळ (28, रा. सिंदखेड राजा), सौ. नयन चारूदत्ता शर्मा (23, तहसील कार्यालयासमोर शेगाव), सौ. रेश्मा गजानन जामधरे (26, रा. निमकवळा, ता. खामगाव), सौ. मंदा रामदास राऊत (27, रा. चिंचोली बोरे, ता. मेहकर), सौ. मनिषा राहुल इंगोले (25, पिंप्री खंदारे, ता. लोणार), रूपाली लक्ष्मण मारवाडी (25, रा. विजयनगर बुलडाणा).

बेपत्ता झालेल्या महिला

संगिता मार्तंड दांदळे (46, रा. नागझरी शिवार, ता. शेगाव), सौ. जया धनराज सोनुने (34, रा. पंचशीलनगर, शेगाव), सौ. मीना भास्‍कर नवघरे (32, नागझरी, ता. मेहकर)

बेपत्ता झालेले पुरुष

शांताराम तुळशीराम सरोदे (54, रा. रोहिणखेड, ता. मोताळा), अनिकेत गजानन काळे (19, रा. संभाजीनगर, चिखली), विजयसिंह मडूसिंह राठोड (23, रा. तानाजीनगर, बुलडाणा), राजू देवराव काळे (44, सागवन बुलडाणा), अजय शंकरलाल किलोलीया (28, रा. गोरक्षण रोड, दालफैल खामगाव), इद्रीस शहा बुढन शहा (38, रा. रोहणा, ता. खामगाव), विष्णू रावबा शेळके (45, रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा), अंकित सुभाष शेळके (21, रा. हाजी मलंग दर्गाजवळ, चिखली रोड, बुलडाणा), धोंडू रामू चव्‍हाण (60, रा. वाघजाळ शिवार, ता. मोताळा).  

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: