क्राईम डायरीमुख्य बातम्या

धक्‍कादायक! नांदुरा तहसीलदारांच्‍या केबिनमध्ये तलाठ्याची आत्‍महत्‍या!; बाथरूममध्ये घेतला गळफास

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा तहसीलदारांच्‍या केबिनमधील बाथरूममध्ये घुसून एका तलाठ्याने सोबत आणलेल्या दोरीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना आज, 15 एप्रिलला सकाळी 9.30 च्‍या सुमारास घडली. घटना समोर येताच शहरभर खळबळ उडाली.

अनिल अंभोरे (42) असे या तलाठ्याचे नाव आहे. तो नांदुरा तहसील कार्यालयात कार्यरत होता. तहसीलदारांच्‍या मुख्य कॅबिनमध्ये प्रवेश करून तेथील बाथरूमच्या खिडकीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्‍याने आत्महत्या केली. यावेळी तहसीलदार हजर नव्हते. सकाळची वेळ असल्याने तुरळक कर्मचारी उपस्थित होते. सफाई कर्मचाऱ्यांना साफसफाई करताना मृतदेह दिसून आला. तहसीलदारांच्‍या कार्यालयात कोणीतरी आत्महत्या केल्‍याचे वृत्त शहरात कळताच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार राहुल तायडे यांनी तहसील कार्यालयात येत आपल्या केबीनमधील बाथरूमचे निरीक्षण केले व पोलिसांना कळवले. अंभोरे नांदुरा शहरात भाड्याने राहत होता. मूळचा घाटबोरी (ता. मेहकर) येथील आहे. पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला. तपास ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तलाठी अनिल अंभोरे गेल्या 1 वर्षापासून कार्यालयीन कामेसुध्दा करत नव्हते. त्‍याच्‍याबद्दल अनेक शेतकर्‍यांच्या तक्रारी होत्या. त्याची पत्‍नी मंगलाबाई अंभोरे, आदित्य व विशाल या दोन मुलांनी नांदुरा तहसील कार्यालय गाठले होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: