बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

धामणगाव बढेत कोरोना विस्‍फोट; 29 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळले!; जिल्ह्यात दिवसभरात 8 जणांचा मृत्‍यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः धामणगाव बढे (ता. मोताळा) येथे कोरोना विस्‍फोट झाल्‍यागत चित्र असून, गावात तब्‍बल 29 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळल्‍याने आरोग्‍य यंत्रणाही हादरली आहे. दरम्‍यान, जिल्ह्यात आज, 25 एप्रिलला कोरोनाने 8 बळी घेतल्याने एकूण बळींचा आकडा 373 वर गेला आहे. उपचारादरम्यान देऊळगाव कोळ (ता. लोणार)  येथील 50 वर्षीय महिला, बुलडाणा येथील 52 वर्षीय पुरुष, सातगाव (ता. बुलडाणा) येथील 60 वर्षीय पुरुष, धाड नाका बुलडाणा येथील 58 वर्षीय पुरुष, उबाळखेड (ता. मोताळा) येथील 65 वर्षीय महिला, वालसावंगी (ता. भोकरदन) येथील 75 वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील 52 वर्षीय महिला  व कौलखेड उमाळा जि. अकोला येथील 66 वर्षीय पुरुष रुग्णाचा  मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्‍या 1264 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर पडली असून, 1006 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज मिळाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 8081 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 6817 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 1264 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 765 व रॅपीड टेस्टमधील 499 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 1865 तर रॅपिड टेस्टमधील 4952 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 167, बुलडाणा तालुका : देऊळघाट 4, नांद्राकोळी 9, दहीद 3, पांगरी 3,  धाड 4, चौथा 3,  चांडोळ 8, वरवंड 6,  तांदुळवाडी 4, साखळी 6, शिरपूर 2, दुधा 6, गुम्मी 3, गिरडा 1, पाडळी 3, तराडखेड 1, सिंदखेड 2, रायपूर 6,  म्हसला 5, सावळी 1, बोदेगाव 4, बोरखेड 1, कुंबेफळ 4, पोखरी 1, मोंढाळा 2, हराळखेड 1, भादोला 1, पिंपळगाव सराई 2, माळविहीर 2, सुंदरखेड 9, दत्तपूर 2, वरूड 1, सागवन 3, उमाळा 2, करडी 1, केसापूर 3, कोलवड 2, येळगाव 3, मासरूळ 5, अजिसपूर 2, धामणगाव 3, जामठी 1, टाकळी 1,सातगाव 1, कुलमखेड 1, डोमरूळ 5,   मोताळा शहर : 10, मोताळा तालुका :  धामणगाव बढे 29,  तरोडा 1,  घुस्सर 1, उबाळखेड 1, काबरखेड 4, पुन्हई 1, ब्राह्मंदा 11, रोहिणखेड 1, चिंचखेडनाथ 1, चिंचपूर 4, राजूर 4, सारोळा मारोती 6, सिंदखेड 2, वडगाव 6, तळणी 2, हनवतखेड 1, गोसिंग 1, डिडोळा 1, शेलापूर 3, बोराखेडी 4, गुळभेली 2, तांदुळवाडी 1, आडविहीर 1, अंत्री 3, सांगळद 1, कोथळी 4, परडा 1, इब्राहीमपूर 2, महालपिंप्री 1, खरबडी 1, जयपूर 9, थड 1, किन्होळा 5, नळकुंड 2, खेडी 1, लपाली 1, पान्हेरा 3, वाडी 1,  माळेगाव 3, टाकळी 1, निपाणा 1, शिवरा 1, कोऱ्हाळा 1,  खामगाव शहर : 42, खामगाव तालुका : टेंभुर्णा 1, राहुड 11, पारखेड 3,  बोरी आडगाव 1, सारोळा 2, निपाणा 2, मांडका 1, ढोरपगाव 4, घारोड 1, उमरा 1, शेगाव शहर : 29, शेगाव तालुका : पहुरजिरा 2,  तिंत्रव 3, आळसणा 1, मनसगाव 2, गाडेगाव 1, मोरगाव 1, येऊलखेड 1, चिंचोली 1,   चिखली शहर : 37, चिखली तालुका :  चंदनपूर 5,  माळशेंबा 2,   शेलूद 1,  खंडाळा 2, काटोडा 1, खैरव 1, टाकरखेड 1, सातगाव भुसारी 3, वरखेड 1, हातणी 1,  दहीगांव 2, अंत्री खेडेकर 1, सावरगांव डुकरे 3, किन्होळा 1, शेलसूर 1, केळवद 4, पळसखेड नाईक 1, अन्वी 1, भोरसा भोरसी 1, मेरा बु 8, भालगांव 5, धोडप 5, गोद्री 1, वळती 1, कोलारा 1, पाटोदा 1, साकेगांव 1, तेल्हारा 1, पळसखेड सपकाळ 1, दिवठाणा 6, गांगलगाव 1, खोर 1, गवंढळा 1, धोत्रा 1, अंबाशी 1, अंत्री 1, बेराळा 1, कव्हळा 3, मलकापूर शहर : 36, मलकापूर तालुका :  दसरखेड 2,  दाताळा 1, हरसोडा 1, कुंड 1,वरखेड 3, वडोदा 2, उमाळी 4, वाघोळा 1, शिवणी 2, शिराढोण 1, जांबुळधाबा 1, बहापुरा 1, देऊळगाव राजा शहर : 9, देऊळगाव राजा तालुका : खैरव 3, अंढेरा 2, कुंभारी 2, सरंबा 4,  भिवगन 1, सातेफळ 1, सावंगी भगत 1, टाकरखेड वायाळ 1, मेंडगाव 1, सिंदखेड राजा शहर : 8, सिंदखेड राजा तालुका :  हनवतखेड 1,  हिवरा गडलिंग 2, जांभोरा 2,  पिंपळखुटा 1,  वखारी 1,  सावखेड तेजन 2, साखरखेर्डा 5, शिंदी 2, वाघोरा 1, सायाळा 4,  लव्हाळा डोरवी 1,  बाळसमुद्र 1, आंचली 1,  बोराखेडी 1, शेंदुर्जन 1, लोणी 1, गोरेगाव 2, पांगरी काटे 2, मोहाडी 1, सवडत 1, पिंपळगाव 1, शेलगाव काकडे 2, सुजलगाव 2, राहेरी 2, शिवणी टाका 1, पळसखेड 2, दुसरबीड 1, किनगाव राजा 1, मेहकर शहर : 69, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 4, साब्रा 2,  नागझरी 1,  भालेगाव 4, ब्रह्मपुरी 6,  वरोडी 2, डोणगाव 4, अंजनी 3, जानेफळ 13,  बाभुळखेड 3,  चिंचोली 2,  हिवरा साबळे 1,  पाथर्डी 2, कळमेश्वर 1,  वडगाव माळी 4, राजेगाव 1, कंबरखेड 1, खंडाळा 2, दे. माळी 2, वर्दळी 1, शेंदला 2, दादुलगाव 2, मोहना 1, उटी 1, उदनापूर 2, परतापूर 1, नांद्रा धांडे 2, असोला 2, कासारखेड 1, अकोला ठाकरे 2, सोनाटी 1, मोळा 1, पिंप्री माळी 1, शेलगाव देशमुख 1, बेलगाव 1, पिंपळगाव माळी 1, लव्हाळा 3, बायगाव 1, सावत्रा 1, सावंगी माळी 1, चोंढी 7, घाटनांद्रा 6, मुदखेड 2, खळेगाव 2, उसरण 2, खामखेड 1, संग्रामपूर शहर : 1, संग्रामपूर तालुका : कवठळ 1, रूधाना 1, रिंगणवाडी 1, काकनवाडा 1, पांचाळा 1, शिवणी 1, टुनकी 6, तरोडा 1, पातुर्डा 1, सावळी 1, पळशी झाशी 1, जळगाव जामोद शहर : 19, जळगाव जामोद तालुका : भेंडवळ 1,  सावरगाव 2,  पिंपळगाव काळे 6, सताळी 2,  पळशी सुपो 1, आडोळ 1, इस्लामपूर 2, चावरा 1, आसलगाव 1, गोळेगाव 2, जामोद 1, वडगाव पाटण 1, वडगाव गड 1, गाडेगाव 1, तरोडा 3, नांदुरा शहर : 38, नांदुरा तालुका : महाळुंगी 6,  निमगाव 10, वाडी 6, बोदरखेड 7, तरवाडी 2, धानोरा 3,  पलसोडा 5,  शेलगाव मुकुंद 1, पोटा 1, डिघी 1, दादुलगाव 1, टाकरखेड 2, पिंप्री अढाव 3, नारखेड 1, अवधा 1, पिंपळगाव खुटा 1, शेंबा 1, अंबोडा 1, जिगाव 3, माळेगाव 1, कोळंबा 1, जवळा बाजार 1, येरळी 1, माटोडा 1, पोटळी 2,  लोणार शहर : 17, लोणार तालुका :  पिंपळनेर 9, देऊळगाव कोळ 2,  बिबी 2,  भुमराळा 4,  धायफळ 9,  सरस्वती 1,  कोयाळी 5,  गोत्रा 1, आरडव 1, सावरगाव 1, सुलतानपूर 4, गायखेड 2, अंजनी 1, चिखला 4, पिंप्री 4, पिंपळखुटा 8, तांबोळा 1, हिवरखेड 2, दादुलगव्हाण 1, बोरी 2, वडगाव तेजन 1, पार्डी शिरसाट 6, शिवणी पिसा 2, हत्ता 1, कोनाटी 1, किनगाव जट्टू 3, मांडवा 1, नावा 1, दातुलवाडी 1,  परजिल्हा रिसोड 1, जाफराबाद 2, नांदेड 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 1264 रुग्ण आढळले आहेत.

7291 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू

आज 1006 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.  आजपर्यंत 335377 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 51415 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 4858 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 59079 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या  रुग्णालयात 7291 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 373 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: