बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

धामणगाव बढेमध्ये कोरोना उद्रेक!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मोताळा तालुक्‍यातील धामणगाव बढे येथे कोरोना उद्रेक झाल्यागत स्‍थिती असून, एकाच दिवशी तब्‍बल 20 रुग्‍ण समोर आल्याने आरोग्‍य यंत्रणेची चिंता वाढली आहे. गावात तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्‍यान, जिल्ह्यात आज, 15 एप्रिलला कोरोनाने 3 बळी घेतले. उपचारादरम्यान चैतन्यवाडी, बुलडाणा येथील 74 वर्षीय पुरुष, रोहिणखेड येथील 37 वर्षीय पुरुष व पांगारखेड ता. मेहकर येथील 67 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3678 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2944 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 734 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 415 व रॅपीड टेस्टमधील 319 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 867 तर रॅपिड टेस्टमधील 2077 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर :111, बुलडाणा तालुका : कोलवड 2, हतेडी 1, सुंदरखेड 1, नांद्राकोळी 5, धाड 3, दुधा 1, सागवन 1, पांगरी 2, कुंबेफळ 2, बिरसिंगपूर 1,पोखरी 2, पळसखेड 1, जंभरून 3, वरवंड 1, जामठी 1, मोताळा शहर : 4, मोताळा तालुका : धामणगाव बढे 20, किन्होळा 1, खेर्डी 1, लपाली 1, पोखरी 1, राजूर 3, सारोळा मारोती 1, वरूड 1, पान्हेरा 1, रिधोरा 1, रोहिनखेड 1, चिंचपूर 2, ब्राह्मंदा 1, पटसूळ 1, काबरखेड 1, खामगाव शहर :34, खामगाव तालुका : गारडगाव 1, पारखेड 4, लांजूड 2, टेंभुर्णा 1, पिंप्राळा 1, पोरज 1, रोहना 1, वर्णा 1, भालेगाव 1, पिंपळगाव गवळी 1, शेगाव शहर :15, शेगाव तालुका : आळसणा 1, पहुरजिरा 1, लासुरा 1, खेर्डा 2, टाकळी विरो 1, जलंब 1, पळशी खुर्द 1, कठोरा 1, चिखली शहर : 59, चिखली तालुका : शेलूद 10, सवणा 2, किन्होळा 2, टाकरखेड 1, गांगलगाव 2, पिंप्री आंधळे 1, मेरा खुर्द 3, अमडापूर 1, कोनड 1, डोंगर शेवली 1, वरखेड 1, खंडाळा 1, धोडप 3, वरूड 1, सवडत 1, करवंड 1, कोलारा 16, मेरा बुद्रूक 4, पेठ 3, वळती 2, शेलसूर 1, बेराळा 1, किन्ही नाईक 1, खोर 1, शिंदी हराळी 1, अंतरी खेडेकर 8, सोनेवाडी 1, पिंपळगाव 2, मुरादपूर 1, आंधई 1, शेलगाव आटोळ 6, मलगी 3, सातगाव 1, आमोना 1, कव्हाळा 1, मंगरूळ 4, चंदनपूर 2, मनुबाई 2, सावरखेड 1, मलकापूर शहर :12, मलकापूर तालुका : वाकोडी 1, कुंड 1, खामखेड 1, दसरखेड 6, उमाळी 4, माकणेर 2, दाताळा 1, देऊळगाव राजा शहर : 13, देऊळगाव राजा तालुका : खैरव 1, नंदखेड 1, अंढेरा 1, सिनगाव 2, सुरा 1, बामखेड 4, नारायणखेड 1, दगडवाडी 1, शिवनी आरमाळ 1, धोत्रा नंदाई 1, तुळजापूर 1, वाघोरा 1, पाडळी शिंदे 1, सिंदखेड राजा शहर : 13, सिंदखेड राजा तालुका : दुसरबीड 4, साखरखेर्डा 11, शेंदुर्जन 1, हनवतखेड 1, खामगाव 1, सायाळा 1, वखारी 1, बाळसमुद्र 5, पिंपळगाव सोनारा 4, पिंपळगाव मलकदेव 1, वाघजाई 1, पळसखेड झालटा 1, शिंदी 1, वसंतनगर 1, माळ सावरगाव 1, पिंपळ खुटा 1, डवरगाव 1, सावखेड तेजन 1, मेहकर शहर : 15, मेहकर तालुका : जानेफळ 1, हिवरा आश्रम 5, देऊळगाव माळी 5, वारूडी 1, कांबारखेड 1, गोहेगाव 3, सोनटी 1, वरवंड 4, मोहदरी 1, लवणा 1, भालेगाव 1, संग्रामपूर शहर :3, संग्रामपूर तालुका : टुनकी 1, कवठळ 1, चांगेफळ 3, वडगाव वान 1, रिंगणवाडी 1, वरवट 1, सावळा 1, सोनाळा 1, जळगाव जामोद शहर : 17, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 1, लाडणापूर 1, खोद्री 1, धानोरा 2, जामोद 1, सुनगाव 1, हिंगणा 1, आडोळ 2, पिंपळगाव काळे 4, झाडेगाव 1, वडगाव पाटण 2, सुलज 1, नांदुरा शहर : 19, नांदुरा तालुका : पोटा 3, निमगाव 4, वसाडी 1, अंबोडा 1, महाळुंगी 1, वडनेर 2, डिघी 4, टाकळी वतपाळ 1, माळेगाव 2, पोटळी 1, चांदुर 2, आलमपूर 2, टकारखेड 4, मामुळवाडी 1, वाडी 2, पिंपळगाव खुटा 1, दादगाव 1, इसापूर 1, लोणार शहर : 16, लोणार तालुका : सुलतानपूर 1, बिबी 8, पळसखेड 1, किनगाव जट्टू 1, पापळ 1, पांग्री 1, वाढोना 1, बोरखेडी 1, तांबोळा 3, धायफळ 1, गोतरा 1, पांगरा 2, वडगाव 1, अंजनी 1, वझर 4, येवती 3, देऊळगाव 1, पर्डी शिरसाट 2, खळेगाव 4, आलेगाव 1, चिखला 2, भुमराळा 2, खंडाळा 2, सायाळा 1, महार चिकना 1, कोनाटी 1, परजिल्हा बोदवड 1, मोप जि. वाशिम 1, रिसोड 1, तोरणाला ता. जामनेर 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 734 रुग्ण आढळले आहेत.

791 रुग्‍णांना डिस्‍चार्ज
आज 791 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 283749 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 42913 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 4447 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 48856 कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या रुग्णालयात 5625 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 318 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: