क्राईम डायरीमुख्य बातम्या

नवजात मुलीला फेकले कॅनॉलमध्ये…!; मेहकर तालुक्‍यातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नदीच्‍या कॅनॉलमध्ये नवजात बाळाला फेकून दिल्याची खळबळजनक घटना नागझरी (ता. मेहकर) येथे आज, 12 मार्चला सायंकाळी 5 च्‍या सुमारास समोर आली आहे.

मेहकर- हिवरा आश्रम रोडवर नागझरी आहे. गावाजवळील कॅनॉलमध्ये स्‍त्री जातीचे हे नवजात बाळ  मृतावस्‍थेत आढळले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आत्‍माराम प्रधान यांनी कर्मचारी घटनास्‍थळी पाठवले. पोलिसांनी घटनास्‍थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी अज्ञात व्‍यक्‍तीविरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. या बाळाला अशा पद्धतीने इथे कुणी आणून टाकले याचा शोध पोलीस घेत आहेत. वृत्त लिहीपर्यंत तपास लागला नव्‍हता.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: