बुलडाणा (घाटावर)

नवा पायंडा… आईचे रक्षाविसर्जन 64 वटवृक्षांसाठी खोदलेल्या खड्ड्यांत करून रोपण!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीच्‍या अंत्‍यसंस्‍कारानंतर रक्षाविसर्जन पवित्र धार्मिक स्थळी, पवित्र नदीपात्रात, तलाव किंवा जलाशयात विसर्जित केले जाते. मात्र यामुळे जलप्रदूषण होते. पाण्याचे व पर्यावरणाचे महत्त्व जाणणाऱ्या देऊळगाव राजा येथील डाॅ. संदीप नागरे यांनी आईच्‍या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम नदीपात्रात न करता 64 वटवृक्षांच्‍या लागवडीचा निर्णय घेऊन त्‍यासाठी खोदलेल्या खड्ड्यात रक्षा विसर्जन केले आणि वृक्षांचे रोपण केले.
डॉ. नागरे यांच्‍या आई दुर्गाबाई नागरे(६४) यांचे निधन 14 एप्रिल रोजी झाले होते. आज, 17 एप्रिलला रक्षा विसर्जन पार पडले. दहावे व तेरवीचा कार्यक्रम सुद्धा थोडक्यात करून येत्या काळात आईच्या स्मरणार्थ पर्यावरण संवर्धन शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रावर सन्मानजनक निधी खर्च करण्याचा मनोदय सेवानिवृत्त शिक्षक नानाभाऊ नागरे, डॉ. संदिप नागरे, व शिक्षक राजेश नागरे यांनी केला आहे. जल प्रदूषण टाळत पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आदर्श ठरतात. धरती बचाओ परिवाराच्या माध्यमातून सातत्याने केला जाणाऱ्या आवाहनाला समाज चांगला प्रतिसाद देत असून अशा प्रकारचे कार्य ही परंपरा झाली पाहिजे, असे विचार यावेळी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे यांनी व्यक्त केले. शिवसेना नेते डाॅ. रामप्रसाद शेळके, काँग्रेसचे ज्‍येष्ठ नेते देवानंद कायंदे, डॉ. रामदास शिंदे, भाजपा ज्‍येष्ठ नेते डाॅ. गणेश मांटे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गिते, नगसेवक गणेश बुरुकूल, मधुकर जायभाये, विजूभाऊ इंगळे, गणेश डोईफोडे आदींनी वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी केलेल्या पर्यावरण सवंर्धनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ही चळवळ लोकचळवळ करण्यासाठी तन मन धनाने सोबत असल्याचे सांगितले. नागरे कुटूंब तथा धरती बचाओ परिवार यांच्या संयुक्त सहभागातून समाजासमोर ठेवलेला आदर्श सर्व समाजासाठी दिशादर्शक ठरेल व यातूनच पर्यावरण संवर्धन चळवळ ही लोकचळवळ होईल, असा आशावाद वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी व्यक्त केला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: