क्राईम डायरीमुख्य बातम्या

नवीन घर घ्यायचे सांगून पत्‍नीकडून कोऱ्या बॉण्डवर घेतल्या सह्या; आता पती दुसऱ्या लग्‍नाच्‍या तयारीत; चिखलीतील विवाहितेने घेतली पोलीस ठाण्यात धाव

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नवीन घर घ्यायचे असल्‍याचे सांगून पतीने कोऱ्या बॉण्डवर सह्या घेतल्या. हाच बॉण्ड तिचा घात करणारा ठरला असून, पती दुसऱ्या लग्‍नाची तयारी करत आहे. ही बाब विवाहितेला कळताच तिने तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. त्‍यावरून अंढेरा (ता. देऊळगाव राजा) पोलिसांनी सासरच्‍या ६ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सौ. माधुरी गणेश लष्कर (28, रा. जामवाडी जि. जालना, ह. मु. वसंतनगर, ता. चिखली) हिने अंढेरा पोलिसांत तक्रार दिली की, तिचा विवाह 2013 साली जामवाडी येथील सैन्यात नोकरीला असलेल्या गणेश मोतीलाल लष्करसोबत झाला होता. दरम्यान लग्न झाले तेव्हापासून ते 10 जानेवारी 2021 पर्यंत सासरच्या मंडळींनी तिचा पैशासाठी छळ केला. माहेरवरून वारंवार पैसे आणण्याची मागणी केली. नवीन घर घ्यायचे असे सांगून गणेशने तिच्‍याकडून कोऱ्या बॉण्डवर व इतर कागदपत्रांवर सह्या घेतल्या. या सह्यांचा गैरफायदा घेत आता गणेश दुसरे लग्‍न करण्याच्‍या तयारीत असल्याचे माधुरीने तक्रारीत म्हटले आहे. छळ असह्य झाल्याने माधुरी तिच्या माहेरी वसंतनगर (ता. चिखली) येथे आलेली आहे. माधुरीच्या तक्रारीवरून गणेश मोतीलाल लष्कर(34), मोतीलाल संपत लष्कर, सुनीता मोतीलाल लष्कर, सुरेश मोतीलाल लष्कर, राधा सुरेश लष्कर, रेखा अंबादास (पिटकार सर्व रा. जामवाडी, जि. जालना) यांच्याविरोधात अंढेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: