चंदेरी

नवीन मुलींकडून करून घ्यायची अश्लील काम; अभिनेत्री नंदिता दत्ताला अटक

कोलकत्ता : अवघ्या देशात उद्योगपती राज कुंद्राच्‍या काळ्या कृत्‍याने खळबळ उडाली असताना आता कोलकात्‍यातही तसाच कारनामा समोर आला आहे. ३० वर्षीय अभिनेत्री नंदिता दत्ता हिला अश्लील व्हिडिओ निर्मिती प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

नंदिताला तिचा सहकारी मैनाक घोष याच्‍यासह ताब्‍यात घेण्यात आले. वेब सीरिजमध्ये काम देण्याच्‍या आमिषाने पॉर्न व्हिडिओमध्ये नवीन मुलींकडून काम करून घेतले जात होते. स्वतः नंदितानेही अशा अनेक अश्लीलपटांत काम केले आहे. एका मॉडेलने नंदिताविरुद्ध तक्रार दिली होती. तिच्‍या तक्रारीनुसार, तिचा न्यूड व्हिडिओ बल्लीगंजच्या एका स्टुडिओत शूट करण्यात आला होता. नंदिताने बनवलेले व्हिडिओ कुठे विकले गेले, याचा तपास पोलीस करत आहेत.

 
 

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: