खामगाव (घाटाखाली)

नांदुरा ः हिंदू धर्माबद्दल अपमानजनक शब्द; गुन्हे दाखल न झाल्यास बजरंग दल करणार तांडव!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तांडव वेबसिरिजमध्ये हिंदू व दलित समाजाबद्दल अपमानजनक शब्दांचा वापर केला असून, यामुळे सर्व समाज बांधवांच्या जातीय भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे मालिका निर्मात्या आणि कलाकारांविरोधात तत्काळ गुन्हे दाखल करून प्रक्षेपण थांबवावे, अशी मागणी बजरंग दलाने नांदुरा तहसीलकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्वरित गुन्हे दाखल न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे होणार्‍या सर्व परिणामास शासनाची जबाबदारी राहील, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदन देताना सचिन मालगे (जिल्हा धर्म प्रचार व प्रसार प्रमुख), भगवान तायडे (तालुकाध्यक्ष विश्‍व हिंदू परिषद), गजानन डिवरे (जिल्हा गोरक्षा प्रमुख), गजानन कुराडे (तालुका मंत्री, विहिंप), शिवा साबे (बजरंग दल तालुका संयोजक), सुशिल कोल्हे, अमोल सुरोसे, तानाजी वनारे आदी हजर होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: