क्राईम डायरीमुख्य बातम्या

नांदुऱ्यातही घरगुती गॅस वाहनात भरणाऱ्या दोघांना पकडले; 13 सिलिंडर जप्‍त

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरगुती गॅस वाहनांत भरणाऱ्या तिघांवर मलकापूर शहर पोलिसांनी कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच आज, 28 जूनला सकाळी नांदुऱ्यातही दोन ठिकाणी छापे मारून अशा पद्धतीने घरगुती गॅस वाहनांत भरणाऱ्या दोघांना बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने अटक केली. त्‍यांच्‍याकडून गॅस वाहनात भरण्याचे साहित्‍य आणि 13 गॅस सिलिंडर जप्‍त करण्यात आले आहेत.

एलसीबीच्‍या पथकाने नांदुऱ्यात येऊन गैबीनगरात छापा मारला असता असीम खान सलीम खान (24, रा. अल्फला मशिदीजवळ, गैबीनगर, नांदुरा) याच्‍या घराच्या आवारात घरगुती गॅस वाहनात भरण्याचे साहित्‍य मिळून आले. एक काँप्रेसर मशीन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा व दहा इंडेन कंपनीचे गॅस सिलिंडर त्‍याच्‍याकडू मिळून आले. नांदुरा आठवडे बाजारातील अमीन बेग अताउल्ला बेग यांच्या घरी छापा मारला असता त्याच्याकडे सुद्धा अवैधरित्या तीन गॅस सिलिंडर, एक काँप्रेसर मशीन, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा मिळून आला. या दोघांविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. तपास नांदुरा पोलीस करीत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: